जालना तालुक्यात ग्रामीण रस्त्यांच्या कामात मोठा गैरव्यवहार; याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंटयाल यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जालना तालुक्यात मंजूर करण्यात आलेल्या ग्रामीण व जिल्हा रस्त्यांच्या कामांमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचा भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.…
