चोपडा प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील.

देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या आयुष्याची अमूल्य वर्षे राष्ट्रसेवेसाठी समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांचा प्रा. आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सन्मान करून त्यांच्या अतुलनीय योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी प्रा. आमदार सोनवणे यांनी माजी सैनिकांशी संवाद साधत त्यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव केला. “देशाच्या संरक्षणासाठी स्वतःचे सुख-दुःख बाजूला ठेवून कर्तव्य बजावणारे माजी सैनिक हे समाजाचे खरे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या निःस्वार्थ सेवेमुळेच देश सुरक्षित असून प्रत्येक नागरिकाला अभिमानाने जगता येते,” असे त्यांनी सांगितले.

सन्मान सोहळ्यात उपस्थित माजी सैनिकांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांनीही या उपक्रमाचे स्वागत करत माजी सैनिकांप्रती व्यक्त केलेला आदर हा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

प्रा. आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सर्व माजी सैनिकांना उज्ज्वल, निरोगी आणि सन्मानाचे आयुष्य लाभावे, अशा शुभेच्छा देत त्यांच्या देशसेवेबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

“देशासाठी सदैव तत्पर, सेवेसाठी कायम सज्ज राहणाऱ्या प्रत्येक माजी सैनिकाला मानाचा मुजरा! त्यांचे शौर्य, त्याग आणि समर्पण हे भारताच्या गौरवशाली इतिहासातील अमूल्य प्रेरणास्थान आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!