Latest Post

मुक्ताईनगरात बंद घर फोडून २ लाख ५६ हजारांचा ऐवज लंपास; निवृत्त बीएसएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी…. विभागीय प्रतिनिधी मुक्ताईनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागील परिसरात एका बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी निवृत्त बीएसएफ कर्मचारी रामराव केशव सूर्यवंशी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे घर ८ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजल्यापासून ते १६ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत बंद होते. याच कालावधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी-कोंडा तोडून घरात शिरकाव केला आणि कपाटात ठेवलेले दागिने व रोकड लंपास केली. चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये सोन्याच्या विविध अंगठ्या, एअर रिंग, मंगळसूत्राच्या वाट्या, कानातील दागिने, गंठण, चैन, लॉकेट तसेच चांदीची पायल, जोडवी आणि २० हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. या सर्व चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत २,५६,९५० रुपये असल्याचे पोलीस दप्तरी नोंदवले आहे. घर बंद असल्याची संधी हेरून ही चोरी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या संशयास्पद हालचाली आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनाज पाटील आणि पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या चोरीच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावरून चिंता व्यक्त होत आहे. या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोनि जयेश पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आर्थिक वादातून व्यावसायिकाच्या हत्येचा कट उधळला; मध्य प्रदेशातील दोघांसह तिघांना अटक उपचारासाठी आली, नराधमांच्या तावडीत सापडली! घाटी रुग्णालय परिसरात तरुणीवर लैंगिक अत्याचार….!! शिरपूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला, थोडक्यात बचावली….. गौताळा अभयारण्य परिसरात खळबळ; वनमजुराच्या घरातच आढळले जिवंत काळवीट

इको क्लबतर्फे पानांच्या माध्यमातून ‘वंदे मातरम्’ला अनोखा सलाम!

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम साधत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुणच्या इको क्लबतर्फे ‘वंदे मातरम्’ला पानांच्या माध्यमातून अनोखा…

‘इंडियन इन्स्टिट्यूट फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन’चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ. आशुतोष त्रिपाठी यांचा सन्मान

नवी दिल्लीतील ‘हॉटेल द अशोक’ येथे ‘राष्ट्रीय हवामान बदल परिषद’ आणि ‘५ वा पर्यावरण रत्न पुरस्कार-२०२६’ आयोजित करण्यात आला होता. | याप्रसंगी ‘इंडियन इन्स्टिट्यूट फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन’चे राष्ट्रीय…

स्वातंत्र्यदिनानिमित्त शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयातर्फे ३०० फूट लांब”भव्य तिरंगा रॅली “उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांनी साकारला राष्ट्रध्वजाभिमान व राष्ट्रभक्तीचा संदेश जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. 79 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाभिमान देशप्रेम, राष्ट्रभक्ती, सांस्कृतिक जाणीव, राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी या हेतूने जळगाव येथील…

शाळा-ग्रामपंचायतीजवळ अवैध दारूचा साठा; तळेगावात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

जामनेर तालुक्यातील तळेगाव येथे अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई; ₹२६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन गुन्हे दाखल जामनेर | विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या…

चोपडा नगराध्यक्षा नम्रताताई सचिन पाटील यांचे आवाहन : पाणी उकळून-गाळून पिणे आवश्यक

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहरातील काही भागांत गवळ किंवा भुरकट रंगाचे पाणी येत असल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर चोपडा नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना आश्वासन दिले आहे. पाण्याची गुणवत्ता…

तिरंग्याच्या रंगात रंगली पालकांची सर्जनशीलता; तिरंगा राखी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा राखी निर्मिती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालकांनी शाळेच्या…

🚨 नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखाली तब्बल ५९१ कोटींची बनावट वर्क ऑर्डर; ३ कोटींची फसवणूक, जामनेरमधून दोघे अटकेत

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नाशिक येथील गोदावरी काठावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) तयार करून मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस…

हिरवांकुर ग्रीन सिटी पर्यावरण-२०२६ महोत्सवात संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग!

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि हरित जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित ‘हिरवांकुर ग्रीन सिटी पर्यावरण महोत्सव–२०२६’ मध्ये श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,…

आदिवासी हक्कांसाठी एकजूट; एकलव्य आदिवासी आघाडी व आदिवासी बचाव समितीचा एल्गार

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. राहुरी, आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून समाजाच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देण्याच्या उद्देशाने एकलव्य आदिवासी आघाडी व आदिवासी बचाव समितीच्या महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी व सदस्यांची…

🚨 नंदुरबार बस स्थानकात वाहतूक पोलिसांची कारवाई; व्यापारी व प्रवाशांची नाराजी

नियम सर्वांसाठी समान असावेत; पार्किंगची सुविधा द्या, अशी व्यापारी व नागरिकांची मागणी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर नंदुरबार बस स्थानक परिसरात बेशिस्त पद्धतीने पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई…

You missed

मुक्ताईनगरात बंद घर फोडून २ लाख ५६ हजारांचा ऐवज लंपास; निवृत्त बीएसएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी…. विभागीय प्रतिनिधी मुक्ताईनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागील परिसरात एका बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी निवृत्त बीएसएफ कर्मचारी रामराव केशव सूर्यवंशी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे घर ८ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजल्यापासून ते १६ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत बंद होते. याच कालावधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी-कोंडा तोडून घरात शिरकाव केला आणि कपाटात ठेवलेले दागिने व रोकड लंपास केली. चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये सोन्याच्या विविध अंगठ्या, एअर रिंग, मंगळसूत्राच्या वाट्या, कानातील दागिने, गंठण, चैन, लॉकेट तसेच चांदीची पायल, जोडवी आणि २० हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. या सर्व चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत २,५६,९५० रुपये असल्याचे पोलीस दप्तरी नोंदवले आहे. घर बंद असल्याची संधी हेरून ही चोरी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या संशयास्पद हालचाली आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनाज पाटील आणि पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या चोरीच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावरून चिंता व्यक्त होत आहे. या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोनि जयेश पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

error: Content is protected !!