आमदार हिकमत उढाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान, सामाजिक बांधिलकी जपत संघटन वाढीचा निर्धार

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

घनसावंगी – शिवसेना (शिंदे गट) दलित आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखपदी वडीरामसगावचे युवा नेतृत्व श्रीरंग वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. आमदार हिकमत उढाण यांच्या हस्ते वाघमारे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार उढाण यांनी वाघमारे यांचे अभिनंदन करत पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत दलित आघाडीची भूमिका महत्त्वपूर्ण असून सामाजिक विविध घटकांना पक्षाच्या विचारांशी जोडण्यासाठी वाघमारे यांनी सक्रियपणे कार्य करावे, अशी अपेक्षा आमदार उढाण यांनी व्यक्त केली.

तसेच तालुक्यातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान वाघमारे यांच्या नियुक्तीचे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी स्वागत केले. त्यांच्या माध्यमातून दलित आघाडीचे संघटन अधिक सक्षम होऊन पक्षाच्या विविध उपक्रमांना गती मिळेल असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नियुक्तीनंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रीरंग वाघमारे यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब आढाव, माजी जिल्हा परिषद सदस्य वामनराव देशमुख, तालुकाप्रमुख आनंदराव शिंदे, संभाजी भालस्कर, राजु देशमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!