चोपडा तालुका प्रतिनिधी – अजय परदेशी.

चोपडा येथील जनसेवा हॉस्पिटलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पक्ष संघटना अधिक सक्षम व मजबूत करण्याच्या दृष्टीने बैठकीत विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी अनेक नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पदनियुक्तीपत्र देऊन त्यांच्या खांद्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. आगामी काळात जनतेच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीस महाराष्ट्र राज्य प्रवक्ते डॉ. चंद्रकांत बारेला, तालुकाध्यक्ष श्री. दिनेश बाविस्कर, विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री. सचिन डाभे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असून, आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

नव्या जबाबदाऱ्या, नवी ऊर्जा आणि मजबूत संघटन; जनतेच्या प्रश्नांसाठी पक्ष कार्यकर्ते सज्ज!

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!