जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

बोरमळी, ता. यावल दीपावली म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण! याच आपुलकीची प्रचिती यावल तालुक्यातील बोरमळी येथे पहायला मिळाली.

बोरमळी येथील आदिवासी पाड्यावर सहपरिवार आदिवासी बांधवांसोबत आगळीवेगळी दीपावली साजरी करण्यात आली. यावेळी आदिवासी पाड्यावरील बंधू-भगिनींना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले, तसेच सर्वांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेण्यात आला.

आनंद वाटल्याने तो अधिक द्विगुणित होतो, याचा प्रत्यय या कार्यक्रमात आला. आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद, आपुलकीने झालेला संवाद आणि प्रेमळ सहवासामुळे दिवाळीचा उत्सव अधिकच आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला.

समाजातील प्रत्येक घटकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी नांदावी, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. माणुसकीचे नाते जपणारा आणि आपुलकीचा आनंद देणारा हा दीपोत्सव सदैव स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. अमोल जावळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बोरमळी येथील आदिवासी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!