जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.

(भुसावळ-जामनेर) जळगांव जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेता शेतपिकांची सद्यस्थिती आणि संभाव्य उत्पादनाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी बुधवारी भुसावळ व जामनेर तालुक्यातील निवडक गावांमध्ये पीक पाहणी केली.

कुऱ्हापाना येथे कापूस, सोयाबीन आणि मका पिकांच्या प्रक्षेत्रांची सविस्तर पाहणी करण्यात आली. यावेळी पिकांची वाढ, उपलब्ध ओलावा आणि एकूण स्थितीबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. त्यानंतर चोरवड येथे सोयाबीन व मका पिकांची पाहणी झाली. जामनेर तालुक्यातील महुखेडा येथे मका, सोयाबीन आणि तूर पिकांच्या प्रक्षेत्रांची तपासणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला.

दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे पिकांवर झालेला परिणाम, जमिनीतील ओलावा, पिकांची वाढ आणि संभाव्य उत्पादन याबाबत वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्यावर या पाहणीत विशेष भर देण्यात आला. क्षेत्रीय पातळीवर मिळालेल्या या माहितीच्या आधारे आवश्यक प्रशासकीय उपाययोजना आखण्यासाठी वस्तुस्थिती समोर आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

जिल्हा प्रशासनाने शेतपिकांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य त्या निर्णयप्रक्रियेस गती देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असल्याचे या पाहणीतून दिसून आले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!