जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
यावल, दिवाळीच्या आनंदात आपल्या माणसांसोबत काही क्षण घालवण्याचा आनंदच वेगळा असतो. याच भावनेतून राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. श्री. संजयभाऊ सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत विटवा वस्ती, ता. यावल येथे लायन्स क्लबच्या वतीने फराळ वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.
दि. ०७ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात मंत्री संजयभाऊ सावकारे यांच्यासह मान्यवरांनी सहभाग घेतला. यावेळी आदिवासी बांधवांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस करण्यात आली.
आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य, दिवाळीचा उत्साह आणि आपुलकीने केलेले स्वागत पाहून उपस्थितांचे मन भारावून गेले.
आपल्या माणसांच्या आनंदात सहभागी होता आले, त्यांच्या चेहऱ्यावर थोडेसे हसू फुलवता आले, हेच या भेटीचे खरे समाधान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सण-उत्सवांच्या निमित्ताने माणुसकीची ही नाती अधिक घट्ट होत राहोत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरत राहो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, लायन्स क्लबचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
