परतूर – जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

नगर परिषदेतील मालमत्ता रजिस्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करून ओ.एस. सावंत यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला असल्याचा गंभीर आरोप आता समोर येत आहे. मालमत्ता रजिस्टरला पैसे कमवण्याचे साधन बनवले असून, मर्जीतील लोकांच्या नावावरील जागा वाढवणे किंवा कमी करणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. या सर्व प्रकरणावर प्रभारी मुख्याधिकारी हिम्मत इंगोले कोणती कारवाई करणार, की केवळ बघ्याची भूमिका घेणार? असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहेत.

७४० नंबर प्लॉटचे प्रकरण गाजले, तरीही खाडाखोड सुरूच

मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदेच्या मालमत्ता रजिस्टरमध्ये ७४० नंबर प्लॉटच्या बोगस मालकी आधारे खरेदीखताचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हे प्रकरण नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलेच तापले होते. या प्रकरणाची नोंद प्रोसिडिंगवर (इतिवृत्तावर) घेण्यात आली असतानाही, ओ.एस. सावंत यांनी मालमत्ता रजिस्टरमध्ये पुन्हा खाडाखोड करण्याचे धाडस दाखवले आहे. या नोंदींवर ‘व्हाईटनर’ लावून मूळ माहिती दडपण्याचे प्रताप केले जात असल्याचा आरोप होत आहे.

दोन भावांच्या वादात ओ. एस. सावंत यांचा हस्तक्षेप?

एका विशिष्ट प्रकरणात दोन भावांच्या जमिनीच्या नोंदींमध्ये खाडाखोड करण्यात आली होती. यामध्ये एकाची जागा कमी करून दुसऱ्याची वाढवण्यात आली. धक्कादायक म्हणजे, यातील एक प्लॉट सत्ताधारी नगरसेवकाच्या मालकीचा होता. जेव्हा संबंधित नगरसेवकाला मालमत्ता रजिस्टरमध्ये खाडाखोड करून आपली मुख्याधिकारी इंगोले यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; तेरी भी चूप, मेरी भी चूप कारभारामुळे नागरिकांत संताप कमी केल्याचे समजले, तेव्हा त्यांनी सावंत यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर घाबरलेल्या प्रशासनाने पुन्हा व्हाईटनर लावून जागा ‘जैसे थे’ केल्याची चर्चा नगर परिषद वर्तुळात रंगली आहे.

मुख्याधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार ?

ओ.एस. सावंत यांच्या या कार्यपद्धतीमुळे शहरातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आपल्या हक्काच्या मालमत्तेच्या नोंदी कधीही बदलल्या जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. असे असतानाही प्रभारी मुख्याधिकारी हिम्मत इंगोले हे कोणतीही कठोर कारवाई करण्याऐवजी ‘तेरी भी चूप, मेरी भी ‘ चूप’ या म्हणीप्रमाणे वागत सावंत यांना कुणाचे राजकीय असल्याचे दिसत आहे. आशीर्वाद लाभले आहेत आणि मुख्याधिकारी या भ्रष्टाचारावर पांघरूण का घालत आहेत, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

परतूरच्या जनतेने आता या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुख्याधिकारी इंगोले या भ्रष्टाचाराची साखळी तोडणार की सावंत यांचे हे ‘धंदे’ असेच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!