विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

मोफत शिक्षणासह स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी केंद्राची मागणी; विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू

जालना : ब्राह्मण समाजातील मुला-मुलींना मोफत शिक्षण मिळावे, तसेच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी केंद्र सुरू करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी दीपक रणणवरे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

जालना शहरातील गांधी चमन, जुना जालना येथे शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी या उपोषणास सुरुवात करण्यात आली. ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मोफत शिक्षणाची सुविधा करावी, तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोयी-सुविधांनी युक्त पूर्वतयारी केंद्र मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

समाजाच्या विविध प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात येत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. संबंधित प्रशासनाने मागण्यांची दखल घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, उपोषणाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या या मागण्यांवर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!