जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
केकाटी मोहल्ल्यात पोलिसांचा सापळा; ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेने केकाटी मोहल्ला परिसरात धडक कारवाई करत ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ६५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विक्रीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी पथकासह तपास सुरू केला होता. जालना जिल्ह्यात अवैध अमली पदार्थ दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, केकाटी मोहल्ला परिसरात एक इसम गांजाची विक्री करत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सायंकाळी सुमारे ७.०५ वाजता छापा टाकला. यावेळी रघु गायकवाड (वय २३, रा. केकाटी मोहल्ला, जालना) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सदर आरोपीविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सचिन गवारे, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, रामप्रसाद परदेशी, प्रमोद वाघ, प्रशांत लोखंडे, रमेश राठोड, देविदास माने, धीरज भारसे, अर्चना गायकवाड, गोवर्धन साळवे तसेच चालक भरत कडुळे यांनी पार पाडली.
