जळगाव शाकीर शेख

नवी दिल्ली : लोकसभेत नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या विरोधात काँग्रेस-नेतृत्वाखालील INDIA आघाडी ने घेतलेल्या भूमिकेविरोधात दिल्ली येथे भाजपा महिला मोर्चा च्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आंदोलनादरम्यान भाजपा नेते व पदाधिकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

महिलांचे सक्षमीकरण हा केवळ सामाजिक मुद्दा नसून विकसित आणि समावेशक भारताच्या निर्मितीचा तो एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. निर्णयप्रक्रियेत महिलांना समान आणि प्रभावी स्थान मिळणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ आयोजित या आक्रोश आंदोलनात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सक्रिय सहभाग घेत महिलांच्या हक्क, सन्मान आणि प्रतिनिधित्वासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले. संसदेत महिलांना न्याय देण्याची ही ऐतिहासिक संधी असताना *काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी* अपेक्षित पाठिंबा न दिल्यामुळे या महत्त्वपूर्ण विधेयकाच्या मार्गात अडथळे निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या अधिकारांना अधिक बळकटी देण्यासाठी हा लढा आणखी व्यापक करण्याचा निर्धार *भारतीय जनता पक्षा* ने व्यक्त केला आहे. महिलांना निर्णयप्रक्रियेत त्यांचे योग्य स्थान मिळवून देण्यासाठी आगामी काळातही अशा जनजागृती उपक्रमांना अधिक गती देण्यात येईल, असे *केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे* यांनी सांगितले.

या प्रसंगी *केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, भाजपा दिल्ली प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव, महाराष्ट्रातील मंत्री मेघना बोर्डीकर, खासदार बांसुरी स्वराज* यांच्यासह विविध राज्यांतील महिला खासदार, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नारीशक्तीच्या एकजुटीचा प्रभावी संदेश दिला.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!