जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

परिषदेने केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून, या अन्यायाविरोधात बाधित नागरिकांनी ५ मे २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या संवेदनशील प्रकरणात आता खासदार डॉ. कल्याण काळे यांनी उडी घेतली असून, त्यांनी जिल्हाधिकारी जालना यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने मानवीय दृष्टिकोनातून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

नेमके प्रकरण काय ?

भोकरदन येथील सर्व्हे नं. ३९ मध्ये संबंधित कुटुंबे मागील ६० वर्षांपासून वास्तव्यास असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्याकडे सन १९८२ पासूनच्या फेरफार नोंदी उपलब्ध असून, शासनाकडून त्यांना वीज, नळजोडणी, वैयक्तिक शौचालय आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनुदानही मिळाले होते. मात्र, २८ एप्रिल २०२६ रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या आदेशानुसार ही घरे जमीनदोस्त करण्यात आली. कोणतीही पूर्वसूचना किंवा पुनर्वसनाची व्यवस्था न करता ही कारवाई केल्याने महिला, मुले आणि वृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!