मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अटी व शर्थी शिथिल करण्यात याव्यात तसेच अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, या प्रमुख मागणीसाठी आमदार मा. रोहितदादा पवार यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथे सुरू केलेल्या आंदोलनास धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

राज्यातील शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असून, कर्जमाफीच्या कठोर अटींमुळे अनेक गरजू शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शासनाने कर्जमाफीच्या निकषांमध्ये तातडीने शिथिलता आणून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी धर्मवीर छावा संघटनेने केली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला संघटनेचा पूर्ण पाठिंबा असून, शासनाने शेतकरीहिताचे निर्णय तात्काळ घ्यावेत, असे आवाहन धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.शेतकरी गोरगरीब कष्टकरी कामगार हिताच्या मुद्द्यावर धर्मवीर छावा संघटना सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन संस्थापक अध्यक्ष गणेश उगले पाटील यांनी रोहित पवार यांना दिले.
यावेळी धर्मवीर छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.गणेश उगले पाटील, मराठवाडा अध्यक्ष शेतकरी आघाडी सूर्यप्रकाश जाधव,जिल्हा संपर्कप्रमुख छत्रपती संभाजीनगर सतीश देवखळे पाटील, जिल्हाउपाध्यक्ष जालना.मा.लक्ष्मण गाडेकर आदी पदाधीकारी उपस्थित होते.
