♦️दगडफेक झाली नसल्याचा पोलिस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांचा दावा

♦️हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रोहित निकम यांनीही दिले निवेदन

चोपडा प्रतिनिधी, यद्नेश पाटील.

दि. १३/०४/२०२६ शहरातील केजीएन कॉलनी येथे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले ७० गोवंश पळवून नेल्याची तक्रार मानद प्राणी कल्याण अधिकारी आदित्य विजय माळी यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला केली आहे. याप्रकरणी त्वरित F I R दाखल करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस निरीक्षकांकडे एका अर्जाद्वारे केली आहे.

श्री. माळी यांनी म्हटले आहे की, केजिएन कॉलनी येथे कत्तलीसाठी ७० गोवंश बांधलेले होते. पोलीस प्रशासनाच्या समोरच काही लोकांनी ते गोवंश पळवून नेले, यावेळी पोलीस प्रशासनावर व गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. घटनेचा व्हिडीओ व जीपीएस प्रणालीसह फोटो पुरावा म्हणून आपल्याकडे उपलब्ध असल्याचे अर्जात म्हटले आहे. चोपड्यात यापूर्वीही अशा घटना घडल्या असून वारंवार तक्रार करूनही योग्य दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोवंश पळवणाऱ्यांवर व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. पळवून नेलेले गोवंश कायदेशीररित्या गोशाळेत जमा करावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रोहित दादा निकम यांनी चोपडा तालुक्यातील गावठी गायींचे बळजबरीने उ‌द्ध्वस्तीकरण व गोरक्षकांवर हल्ले होत आहेत. गोरक्षकांना धमकी दिली जाते व त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. हे गौहत्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन असून, महाराष्ट्र शासनाने देशी गायींना “राज्यमाता-गौमाता” दर्जा द्यावा, गायींचे उद्ध्वस्तीकरण थांबवा व गोरक्षकांवरील गुन्हे रद्द करा, गौहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, गोरक्षकांना धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा व गौशाळांना संरक्षण द्या, आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास शांततापूर्ण आंदोलन छेडण्यात असा इशारा देण्यात आला आहे. तसे निवेदन पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांना दिले. यावेळी नगरसेवक गजेंद्र जयस्वाल, अनिल वानखेडे, संग्राम परदेशीं, नगरसेवक शरद पाटील, प्रवीण जैन यांच्यासह असंख्य गोरक्षक, हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी ठिय्या मांडून पोलीस स्टेशन येथे उपस्थित होते.

दि. १५/०४/२०२६ रोजी पी आय मधुकर साळवे यांना तात्काळ निलंबित करा व गो हत्यारांवर गुन्हे दाखल करा व त्यांच्यावर कारवाई करा अश्या  विविध मागण्यासाठी चोपडा तालुक्यामधून मोर्चा निघाला होता व तहसीलदार भाऊसाहेब थोरात व पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांना निवेदन देण्यात आले आहे. पीआय मधुकर साळवे यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी चोपडा तालुका करत आहे. पीआय मधुकर साळवे यांच्या विरोधात चोपडा तालुक्यातील लोकांच्या मनात खूप आक्रोश आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!