धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे.

बालाजी नगरी, बेटावद या ठिकाणी भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्ञानयोगी, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त समता बंधुता व न्यायाचे संदेश देणारे महामानवाला अभिवादन करण्यासाठी बेटावद पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी पंचशील समितीच्या आयोजकांनी बेटावद पंचक्रोशीतील भाजपाचे उदयोन्मुख नेतृत्व व सरचिटणीस भाजपा कामगार मोर्चा उत्तर महाराष्ट्र श्रीमान दादासो महेश पाटील यांच्या करकमलांनी महामानवाला माल्या अर्पण करून अभिवादन केले.

यावेळेस विशेष उपस्थिती बेटावद सरपंच दादासो मंगलचंद जैन दादासो सुजित पवार, दादासो राजेंद्र बोरसे, आबासो मंगेश पवार, दादासो ललित वारुळे, आबासो राजेंद्र कोळी, बी एम पाटील सर, फुले सर, दादासो लोटन महाजन, बापू भोई, बापू बागुल, दादासो शंतनू थोरात, दादासो संदीप थोरात, बळीराम थोरात, भाऊसो अनिल महाले, अशोक वाघ, महिरे आबा, धनराज चौधरी, गणेश माळी, सुनील आण्णा पवार, देवाजी भाऊ, शालिक नाना वाकडे, बापू पैलवान व मैराळे गुरुजी व इतर सन्माननीय मंडळी उपस्थित होते, यावेळेस समस्त भीमसैनिकांनी बुद्ध वंदना सादर केले अगदी उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात महामानवाला कोटी कोटी अभिवादन करण्यात आले.

तसेच यावेळेस शालेय विद्यार्थ्या व विद्यार्थिनीच्या सांस्कृतिक व बाबासाहेबांच्या जीवनपटावर गीत सादर करण्यात आले, त्यांना प्रोत्साहन पर बक्षीस दादासो महेश पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!