जळगांव प्रतिनिधी:- निलेश खैरनार.
जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात मंगळवार दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते ९ या वेळेत भारतरत्न तथा भारतीय संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती प्रमुख अतिथी तथा शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक, व्याख्याते श्री.सुरेश कुलकर्णी, शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ रमा तारे, तसेच विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविक सौ.रेवती किन्हीकर यांनी केले.या प्रसंगी प्रमुख अतिथी यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी प्रसाद जैन, हर्षदा चौधरी, तृषा पाटील, प्रज्वल साळुंखे, खुशाल पाटील, गौरव साबळे, गौरव देशमुख, अर्णव गडे, सौरभ कोळी, सचिन पंडित, ऋषिकेश कोळी, आदी शालेय विद्यार्थांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर मराठी, इंग्रजी भाषेतून सुंदर, भाषणे सादर केली. या वेळेस ज्येष्ठ शिक्षिका सौ.पद्मजा जोशी यांनी डॉ.आंबेडकर यांच्यावर सुरेल गीत सादर केले तर श्रीमती संपदा तुंबडे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्यावर आधारित स्वरचित कविता सादर केली. शिक्षक सौ.मनिषा वानखेडे व श्री.श्रीकांत घुगे यांनी बोधिसत्व डॉ.आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. प्रमुख वक्ते श्री.सुरेश कुलकर्णी सर यांनी डॉ.बाबासाहेब यांच्या जीवन कार्याचा सविस्तर आढावा सादर करून त्यांनी शोषित, वंचित, कामगार, महिला यांच्या साठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच बाबासाहेबांनी बौद्ध धर्म दीक्षा घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे सर यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची सविस्तर माहिती होऊन त्यांना वाचन प्रेरणा मिळावी या हेतूने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके शालेय ग्रंथालयास भेट दिली. तसेच विद्यार्थांनी शील, प्रज्ञा, करुणा या गुणांची वाढ करून डॉ.बाबासाहेब यांच्यासारखे ज्ञानवंत होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुनीता रोटे यांनी तर आभारप्रदर्शन सौ.संगीता कुलकर्णी यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.सोमनाथ महाजन, सौ.कविता कुऱ्हाडे, श्री.राकेश चौधरी, श्री दीपक पाटील व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.
