जळगांव प्रतिनिधी,

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयात गुरुवार दिनांक १९/०२/२०२६ रोजी शिव जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे सर, उपमुख्याध्यापक श्री. प्रशांत जगताप सर पर्यवेक्षक श्री. संजय वानखेडे सर, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सौ. पद्मजा जोशी आणि श्री. आनंद पाटील यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शिवरायांबद्दल माहिती सांगितली. श्री. पांडूरंग सोनवणे यांनी “अमुचे दैवत छत्रपती” हे गीत सादर केले. कनिष्का ठाकरे, जगदीश शिंपी, विनय पाटील, खुशी पाटील, प्रज्ज्वल साळुंखे, श्रद्धा पाटील, ईशा गवळी, प्रसाद जैन, निरंजन डांबरे, विवेक नाथजोगी, सचिन पंडीत, योगेश पाटील, केतन कपाटे या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर भाषण, कथा, पोवाडा, गीत इ. सादर करून शिवरायांविषयी आपले प्रेम व्यक्त केले. कृष्णा ताम्बट, गौरव साबळे, कृष्णा शर्मा, कार्तिक राठोड, लोकेश घुगे, उदय भालेराव या विद्यार्थ्यांनी “युगत मांडली” हे समूहगीत सादर केले. यावेळेस दुर्गेश सराफ याने सम्बळ वर साथ दिली. लावण्या निंबाळकर या विद्यार्थीनीने “माय भवानी” हे नृत्य सादर केले. शेवटी माननीय मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे सर यांनी अध्यक्षीय भाषण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिवरायांचे गुण अंगीकारण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संगिता पानट आणि आभार प्रदर्शन सौ. मनिषा पवार यांनी केले. सूत्र संचालन कु.टिशा नेहेते या विद्यार्थीनीने केले. जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती निमित्त आयोजित प्रभात फेरीमध्ये शाळेतील विद्यार्थी व शिक्षक श्री.आनंद पाटील ,श्री.प्रणित येवले सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. श्रीकांत घुगे, सौ. स्मिता करे, श्री. योगेश सोनजे, सौ. यमिनी चौधरी, सौ. जागृती मोराणकर, श्री. पंकज महाले ,श्रीमती संपदा तुंबडे यांनी सहकार्य केले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!