जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

सौ.सु. ग. देवकर प्राथमिक शाळा, जळगाव व भारतीय योग संस्थान, नवी दिल्ली द्वारा संचलित निशुल्क योग वर्ग महात्मा गांधी उद्यान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

सकाळ व दुपार दोनही विभाग इ. १ ली ते इ. ४ थी चे विद्यार्थ्यांनी विविध योगासने प्रात्यक्षिकासह सादर केले. नंदा पतंगे,सविता महाले,कृष्णा पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगासनांची माहिती सांगून प्रात्यक्षिके सादर केली.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा साळुंखे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. सौ. सपना नेमाने यांनी सूत्रसंचालन तर आभार श्रीमती कल्पना पवार यांनी मानले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!