जळगांव जिल्हा प्रतिनिधी.
जळगाव शहरात राजर्षी शाहुमहाराज सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था. शाहूनगर जळगाव तर्फे छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. १५ फेबु. रविवार रोजी शाहुनगर येथे जगण्याचे सुत्र शिवचरित्र ह्या विषयावर श्री. रविंद्र तुकाराम पाटील. (लेखक) याचे व्यख्यान आयोजित केले होते. या वेळी नवनिर्वाचित महापौर सौ. दिपमालाताई मनोज काळे तसेच प्रभाग क्र ६ चे नगरसेवक श्री दिपकभाऊ सुर्यवंशी, अमिताभाऊ काळे, विजय बांदल, अँडव्होकेट सुचिताताई हाडा, अर्शीन बानो शोएब खाटीक ह्या नगरसेवक चा सत्कार करण्यात आला. यावेळी बाल शाहीर राजवीर प्रतीक आरडे याने सुंदर असा पोवाडा साजरा केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री विजय विष्णु वाडकर माजीनगरसेवक, अशोक जाधव, प्रमोद वाणी, नारायण टेकावडे, शरद टेकावडे, संजय साळुंखे, संतोष शेळके, भिकन भोई, कैलास तिवारी, सुरेश भगत, जितेंद्र टेकावडे, सागर पोळ, हरेश्वर कोयते, तानाजी मानकुबंरे, अशोक गायकवाड, शिवाजीराव मुळीक, वसंत गायकवाड, मयुर मुळीक, शुभम वाडकर, गोलु रणशिंगे, दर्शन टेकावडे इत्यादीनी परिश्रम घेतले आभार प्रदर्शन सार्थक टेकावडे व सूत्रसंचालन संजय दुसाने यांनी केले.
