जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेला “ज्ञान प्रबोधन” कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विविध बौद्धिक, शैक्षणिक, सर्जनशील तसेच व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित उपक्रमांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध गटचर्चा, खेळ, प्रात्यक्षिके आणि कृतीआधारित उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संवादकौशल्य तसेच संघभावना विकसित करण्यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन ज्ञान प्रबोधिनी, पुणे यांच्या प्रशिक्षित मार्गदर्शक नचिकेत नित्युरे दादा, माननीय मानसी बोडस मॅडम, माननीय सुधा रहाणे मॅडम यांनी केले. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नवीन विचार, ज्ञान आणि जीवनमूल्यांची प्रेरणा मिळाली.

या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. सचिन देशपांडे सर, उपमुख्याध्यापक श्री. प्रशांत जगताप सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री. संजय वानखडे सर, पर्यवेक्षिका रमा तारे मॅडम व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इयत्ता आठवीच्या सर्व वर्ग शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी खूपच प्रेरणादायी व ज्ञानवर्धक ठरला.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!