जळगाव :- समूह विकास कार्यक्रम अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील केळी समुहाकरीता अंमलबजावणी यंत्रणेची निवड करणेकरीता रिक्वेस्ट फॉर प्रपोजल सादर करणेसाठी १८ सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

केळी क्लस्टरमधील पूर्व-उत्पादन आणि उत्पादन, काढणीनंतरचे व्यवस्थापन व मूल्यवर्धन, लॉजिस्टिक, मार्केटिंग आणि ब्रॅडींग या व्हर्टीकल करीता पात्र अंमलबजावणी संस्थानी केळी समुहाच्या अंमलबजावणी करीता त्यांचे प्रस्ताव ऑनलाईन पोर्टलद्वारे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यांनी केले आहे.
इच्छूक संस्था http://nhb.gov.in या वेबसाईटवरून अधिक माहिती आणि रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) सादर करण्याची प्रक्रिया पाहू शकतात असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पी. एस. म्हस्के यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
