जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

शिक्षकांचा करण्यात आला सन्मान

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात शनिवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिनाचा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सुरवातीस शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे, पर्यवेक्षक श्री. जगदिश साळुंखे विद्यार्थी मुख्याध्यापक कुणाल ठाकरे, उपमुख्याध्यापक लावण्य घुगे, पर्यवेक्षक डिंपल धनगर, देवेंद्र सोनवणे आदींच्या हस्ते माजी राष्ट्रपती तथा शिक्षण तज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे यांनी शिक्षकांचे आपल्या जीवनात असलेले महत्व विषद करून शिक्षकांचा व आई वडिलांचा सन्मान करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी 100 पेक्षा जास्त शालेय विद्यार्थांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शालेय पदाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.

या वेळेस विद्यार्थी शिक्षकांनी शालेय विषय, तसेच क्रीडा, संगणक, ग्रंथपाल, सेवक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांच्या भूमिकेत शालेय कामकाज सांभाळले. या प्रसंगी शाळेतील शिक्षकांचा गुलाबपुष्प, पेन व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सन्माननीय पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!