जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी.
दि. १४ मे रोजी मौजे मोहगण बु. येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र, पाल यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा उत्साहात पार पडली.

या कार्यशाळेस प्रगतिशील शेतकरी श्री कडु चौधरी , श्री राहुल चौधरी , श्री सिद्धेश चौधरी यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ महेश महाजन ,शास्त्रज्ञ श्री अतुल पाटील, मंडळ कृषी अधिकारी श्री ललित इंगळे, शास्त्रज्ञ इंजि. सौरभ कुमार गडाख, शास्त्रज्ञ प्रा. राकेश कापगते, उप कृषी अधिकारी श्री जगदीश देशमुख तसेच सहायक कृषी अधिकारी श्री संदीप बारेला उपस्थित होते.

कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री संदीप बारेला यांनी केले व बियाणे खरेदी वेळेस घ्यावयाची काळजी या वर मार्गदर्शन केले प्रा श्री अतुल पाटील यांनी रासायनिक खताचा संतुलित वापर व घरगुती बियाण्यांची उगवण क्षमता कशी वाढवावी आणि बीजप्राकीया विषयी माहिती दिली. इंजि. सौरभ कुमार गडाख यांनी रुंद वरंबा सरी लागवड तंत्रज्ञान (BBF) याचे महत्त्व स्पष्ट केले.

शास्त्रज्ञ श्री डॉ महेश महाजन यांनी पनामा मर व एल निनो याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री राकेश कापगते यांनी केले. या कार्यशाळेला गावातील शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व कार्यक्रमाला प्रगतीशील शेतकरी श्री कडु चौधरी, श्री सिद्धेश चौधरी व कृषिताई आयशा सरफराज तडवी याचे सहकार्य लाभले.
