जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील

सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम समितीचा पुढाकार; रोहितदादा निकम फाउंडेशन व मित्रपरिवाराचे प्रायोजकत्व

चोपडा : शहरातील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या वतीने, मा. श्री. रोहितदादा दिलीपराव निकम फाउंडेशन, जळगाव तसेच मित्रपरिवाराच्या प्रायोजकत्वातून ‘दहीहंडी उत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला.

दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शहरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि गोविंदा पथकांचा जोश यामुळे परिसर दुमदुमून गेला. विविध गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांच्या जोशपूर्ण प्रयत्नांना उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्स्फूर्त घोषणांनी दाद दिली.

या सोहळ्यास नागरिक, युवक, महिला तसेच विविध गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्सवाची शोभा वाढवली. सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन हा उत्सवाचा मुख्य संदेश ठरला.

भारतीय संस्कृतीतील पारंपरिक उत्सवांचे महत्त्व जपत नव्या पिढीपर्यंत ही समृद्ध सांस्कृतिक परंपरा पोहोचविण्याचा सकारात्मक संदेश या आयोजनातून देण्यात आला. आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व नागरिकांचे सहर्ष स्वागत व आभार मानण्यात आले.

उत्साह, आनंद आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात ‘दहीहंडी उत्सव २०२६’ मोठ्या दिमाखात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!