
शहापूर प्रतिनिधी, दिपक विशे.
रविवार दि.19 जानेवारी रोजी अहमदनगर येथील अहिल्यानगर क्रीडा संकुल, वाडिया पार्क येथे आयोजित इंडियन ओपन रिपब्लिकन कप *उपमुख्यमंत्री चषक 2025 कराटे स्पर्धेत* 12 राज्यांतील 900 हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने म्हणजेच आपल्या शहापूर तालुक्यातील सार्थक इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थांनी आपली चतुरस्र कामगिरी दाखवत प्रथम पारितोषिकासह 51,000 रुपयांचे रोख बक्षीस जिंकले. शाळेचे मुख्याध्यापक संतोष निचिते सर , उप मुख्याध्यापक अरविंद निपुर्ते सर स्पोर्ट्स शिक्षक संतोष विशे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

वर्षा वालकोळी मॅडम यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ८ गोल्ड,१२सिल्व्हर व ४ ब्राँझ मेडल्स पटकावले.
स्पर्धेचे आयोजन युथ कराटे फेडरेशनच्या वतीने करण्यात आले होते, माननीय पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. अहील्यानगरचे आमदार मा.संग्राम जगताप साहेब हेदेखील उपस्थित होते.
या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सबिल सय्यद व साहिल सय्यद यांनी केले होते तर महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक अमोल शेटे यांनी संघाला मार्गदर्शन केले. महाराष्ट्र संघाने रोख बक्षीसासह आपल्या संघाचे व राज्याचे नाव उज्ज्वल केले.
