मुंबई / पुणे – राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या सरींना अखेर ब्रेक लागला आहे. बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या ‘मुरासू’ चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली असून त्याचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, ४ ते ८ नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता नाही. राज्यात कोरड्या वातावरणासह तापमानात वाढ होणार आहे.

काल मुंबईत कमाल तापमान ३६.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा जास्त आहे. मुंबईकरांना नोव्हेंबरमध्येही घामाच्या धारा लागल्या आहेत.

आजचा अंदाज –

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान पूर्णपणे कोरडे आणि गरम राहणार आहे. सकाळी थंडीची चाहूल आणि दुपारी कडक ऊन असा दुहेरी अनुभव नागरिकांना येणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही मुख्यतः निरभ्र आकाश राहील.

शेतकऱ्यांसाठी हा दिलासा असला तरी नागरिकांनी पुढील चार दिवस उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!