मराठवाडा प्रतिनिधी अनिरुद्ध साबळे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेब व त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू करण्याचा जो निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्या मधील सर्वसामान्य मराठी माणसाच्या आशा पल्लवित झालेल्या असून आता जिल्हा परिषद शाळांचे रुपडे बदलून जिल्हा परिषद शाळांना येणार सुगीचे दिवस असे वाटू लागले आहे. विद्यार्थी व पालकांच्या दृष्टिकोनातून शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा दर्जा सुधारून उत्कृष्ट पद्धतीचे शिक्षण हे जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील मिळेल. शिक्षण विभागात एक चांगला घेतला त्याबद्दल सर्व महाराष्ट्रातून शिक्षण मंत्र्याचे व मंत्रिमंडळाचे कौतुक होत आहे.

खाजगी इंग्रजी शाळेमध्ये मुलांना ऍडमिशन घेण्यासाठी पालकांना जो खिशाला भुर्दंड पडत होता तो आता या जिल्हा परिषद शाळेमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू केल्यामुळे तो कमी होणार आहे व पालकांना दिलासा मिळणार आहे, आताचे युग हे प्रगतीचे युग आहे, त्यामुळे कोणालाही आपल्या मुलांना उच्च शिक्षण घ्यावेसे वाटत आहे, पण खाजगी शिक्षण संस्थावाले शिक्षणाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा फीस घेत आहे, त्यांना आत्ता जिल्हा परिषद शाळेमध्ये सीबीएससी पॅटर्न चालू केल्यामुळे आळा बसणार आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू करण्याचा जो निर्णय घेतला, तो महाराष्ट्र मधील मराठी माणसाच्या व विद्यार्थी व पालकांच्या अनुषंगाने तो निर्णय चांगला घेतला, त्याबद्दल सर्व राज्यभरातून त्यांच्या निर्णयाचं कौतुक होत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!