जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ, संचालित शेठ ला.ना.सा. विद्यालयात सोमवार दिनांक १५ जून रोजी सकाळी ७ वाजता नवीन शैक्षणिक वर्षास मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. नवीन शैक्षणिक प्रवेशोत्सवाचा शुभारंभ विद्येची आराध्य देवता सरस्वती माता, छत्रपती शिवाजी महाराज, युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे व ग्रंथ पालखीचे पूजन संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.श्री. सुशील दादा अत्रे, सचिव श्री अभिजीत देशपांडे, सहसचिवा सौ मीराताई गाडगीळ, जेष्ठ संचालक प्राध्यापक शरदचंद्र छापेकर, श्री पारसमल कांकरिया, समन्वयिका सौ.लताताई छापेकर, सौ. विजयालक्ष्मी परांजपे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे सर, उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप सर, पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे सर, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी इयत्ता पाचवी मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे टिळा लावून औक्षण करण्यात आले तसेच गुलाबपुष्प देऊन तसेच पुष्पवृष्टी करून मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले .याप्रसंगी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावे म्हणून ग्रंथ पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. व्यासपीठावरील कार्यक्रमात शालेय प्रार्थना, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप सर यांनी केले.

यावेळेस स्वरचित शालेय गीत संगीत शिक्षिका संपदा छापेकर यांनी सादर केले. तसेच इ. ५ वी ते ८ वी च्या क्रमिक पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार, स्वच्छता, आरोग्य याबाबतचे महत्व समजावे याकरिता त्यावर आधारित “फुग्यावरील संदेश वाचन “हा अभिनव उपक्रम विद्यार्थांनी सादर केला त्यांना सौ. प्राजक्ता गोहिल यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सौ. मीराताई गाडगीळ यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी शाळेचा सेल्फी पॉईंट, तसेच रांगोळ्या काढून, सुंदर फलक लेखन तसेच स्वच्छता करून शाळेचा परिसर सुशोभित करण्यात आला होता. तसेच विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्राजक्ता गोहिल मॅडम तसेच आभार प्रदर्शन सौ. वृषाली पाटील मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!