जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

४ लाख ४९ हजार ९००/- रुपयाची लोखंडी सळई जप्त.

 

पोलीस अधिक्षक श्री. तेगबिरसिंह संधु यांनी जिल्हयातील अवैध धंदयावर कार्यवाही करणे बाबत सर्व पो. स्टे अधिकारी यांना दिलेल्या सुचने प्रमाणे दि. १८/०५/२०२६ रोजी चंदनझिरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब पवार यांनी अवैध धंदयावर कार्यवाही करण्यासाठी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन गुप्त बातमी मिळवुन मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर पथकाने छत्रपती संभाजी नगर जालना रोडवरील नागेवाडी टोलनाक्या जवळ अवैध सळई विक्रेता नवनाथ पांडुरंग गवळी रा. चंदनझिरा जालना याचेवर पथकाने छापा टाकुन विविध स्टिल कंपनीचे ०४ लाख ४९ हजार ९०० रुपयाची लोखंडी सळई जप्त करण्यात आली. सदर आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन चंदनझिरा येथे पोलीस अंमलदार कृष्णा तंगे यांच्या फिर्यादी वरुन गुरनं. ३२२/२०२६ क. १२४ महाराष्ट्र पोलीस कायदा नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!