जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
जालना शहरात दिनांक १९/०५/२०२६ रोजी ०९.३८ वाजता शिवकुमार कॉम्प्लेक्स अंन्नाभाऊ साठे पुतळ्या जवळ जुना जालना येथे ११२ कॉलव्दारे माहीती मिळाली की, एक व्यक्ती चाकु घेवुन कॉलरला मारहाण करण्यासाठी आलेला आहे. असा कॉल प्राप्त झाल्याने ११२ अमलदार व बिट अमलदार असे बातमी मिळाल्यांचे ठिकाणी पोलीस पथक खाजगी व सरकारी वाहनाने रवाना होवुन सदर ठिकाणी ठिक ०९.४५ वाजता पोहचलो असता, तेथे एक ईसम हातात सुरा घेवुन कोणावरतरी प्राणघातक हल्ला करण्याच्या उददेशाने दहशत निर्मान करत होता व जोरजोरात ओरडत होता.

त्यास शिताफीने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विरेंद्र लक्ष्मनराव खैरे वय 42 वर्ष रा. मस्तगड हनुमान टेकडी जुना जालना असे असल्याचे सांगीतले. त्याची दोन पंचासमक्ष समक्ष झडती घेवुन त्याच्या हातातील धारदार पाते असलेला लोखंडी खंजर मिळुन आढळून आला, त्यानुसार गुन्हेगाराला तत्काळ पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही केली.
