जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

MIDC भागात तलवार घेवुन दहशत निर्माण करणारा व चंदनझिरा भागात तलवार बाळगणारा असे दोघांवर चंदनझिरा पोलीसांची कार्यवाही ०२ धारदार तलवार जप्त

दि. १८/०५/२०२६ रोजी १३.०० वाजेच्या दरम्यान MIDC भागात अवैध रित्या धारदार शस्त्र तलवार बाळगुन दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब पवार यांना मिळाल्याने पोलीस स्टेशनचे अंमलदार MIDC भागातील आयकॉन स्टिल चौकात आरोपी नामे सय्यद साबेर सय्यद निसार वय 22 वर्षे रा. नुतन वसाहत जालना हा धारदार तलवार हातात घेवुन जोरजोरात आरडा ओरडा करुन दहशत माजवत होता त्यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातील तलवार जप्त करुन त्याच्या विरुध्द पोलीस अंमलदार रवि देशमुख यांचे फिर्यादवरुन कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस अंमलदार प्रशांत देशमुख हे करीत आहे. तसेच दि. १७/०५/२०२६ रोजी चंदनझिरा भागातील पदमावती नगर येथे एक बालअपचारी हा तलवार बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच MIDC भागात पोलिसांनी कारवाई केली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!