जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या २३ कोटी ३३ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी भोकरदन शाखेचे व्यवस्थापक नटवर सत्यनारायणजी दायमा आणि धक्कादायक म्हणजे या प्रकरणातील फिर्यादी राजेंद्र भिकचंद टोकशा यांनाच पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या गुन्ह्यात आता ‘ठेवीदारांचे हितसंबंध जोपासणारा कायदा’ (MPID) देखील लागू करण्यात आला आहे.

जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेत वेअर हाऊसच्या नावे १७७ बनावट खातेदार तयार करून बँकेची २३ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार चंदनझीरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेला सोपवला होता.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!