आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी; प्रा. जयश्रीताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकांना निवेदन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, पाचोरा : महेश माळी

महिला व विद्यार्थिनींचा पुढाकार

एम.एम. महाविद्यालय पाचोरा येथील प्राध्यापिका, लिनेस क्लब पाचोरा अध्यक्षा तथा रेकी आचार्य प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. भाजप ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ पाचोरा तालुका अध्यक्षा तथा लिनेस क्लबच्या पी.आर.ओ. कु. चेतना रणदीप हिरे यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली.

स्वाक्षऱ्यांचे पत्रक सादर

या निवेदनासोबत नागरिक, विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या स्वाक्षऱ्यांचे पत्रकही जोडण्यात आले आहे. यावेळी एम.एम. महाविद्यालयाची विद्यार्थिनी पृथ्वी आखाडे, गायत्री क्षीरसागर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. अशा घटनांमुळे महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी प्रा. जयश्रीताई वाघ यांनी व्यक्त केले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!