जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.

लग्नसमारंभातील हळदीच्या कार्यक्रमात कमरेला गावठी कट्टा लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला कासोदा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली आहे. लखन प्रकाश वाघ (वय २४, रा. परधाडे, ता. पाचोरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे.

🚩 हळदीच्या कार्यक्रमात उडाली होती खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी एरंडोल तालुक्यातील ताडे येथे एका हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ११:३० वाजेच्या सुमारास बँडच्या तालावर नाचत असताना लखन वाघ याच्या कमरेला एक शस्त्र (अग्निशस्त्र) खोचलेले असल्याचे काही उपस्थितांना दिसले. याबाबत नागरिकांनी विचारणा करण्यास सुरुवात करताच, आरोपीने गर्दीचा फायदा घेत तेथून पळ काढला. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

🚔 पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी तपासाचे आदेश दिले. ५ मे रोजी पोलिसांना खात्रीशीर बातमी मिळाली की, संशयित आरोपी लखन वाघ हा पुन्हा ताडे गावाच्या परिसरात शस्त्र घेऊन फिरत आहे. या माहितीवरून पोलिसांनी तातडीने भातखेडे चौफुली येथे सापळा रचला. संशयित आरोपी तिथे येताच पोलिसांनी त्याला घेराव घालून ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!