बळीराजाची मदतीसाठी आर्त हाक; कर्जबाजारीपणामुळे व शेतीच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल

​छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा प्रतिनिधी (अनिरुद्ध साबळे):
​गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यातील शेतकरी होरपळून निघाला आहे. या संकटाची भीषणता इतकी वाढली आहे की, चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच मराठवाड्यातील तब्बल २१७ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. सरकारी आकडेवारीनुसार समोर आलेल्या या धक्कादायक वास्तव्याने प्रशासन आणि सरकारसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

​जिल्हानिहाय आत्महत्येची आकडेवारी
​मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक असून, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे. प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यानुसार स्थिती खालीलप्रमाणे आहे:
​बीड: ५२ आत्महत्या
​छत्रपती संभाजीनगर: ४५ आत्महत्या
​नांदेड: ३८ आत्महत्या
​धाराशिव: २८ आत्महत्या
​जालना: २१ आत्महत्या
​परभणी: १५ आत्महत्या
​लातूर: १२ आत्महत्या
​हिंगोली: ६ आत्महत्या

​मुख्य कारणे: कर्ज, नापिकी आणि मदतीची प्रतीक्षा
​मराठवाड्यात गेल्या हंगामात पावसाने ओढ दिल्याने आणि काही भागात अतिवृष्टीमुळे शेतीच्या नापिकीचे संकट ओढवले. उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी बँकांचे कर्ज फेडू शकलेला नाही. त्यातच, हक्काचा पीक विमा केव्हा भेटेल? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. पीक विम्याच्या रखडलेल्या मंजुरीमुळे आणि कंपनीच्या तांत्रिक अटींमुळे बळीराजाला आर्थिक आधार मिळणे कठीण झाले आहे.

 

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!