जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये अहिरवाडी ते केऱ्हाडा रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून यासंबंधित अधिकारी आणि ठेकेदार मात्र याविषयावर काही उत्तर देण्याचे टाळताना दिसून येत आहे. तसेच याच रस्त्यावरील पुलाचे काम देखील निकृष्ठ दर्जाचे असून, सदर रस्त्याचे काम आणि पुलाचे काम फक्त थातूरमातूर पद्धतीने करून ठेकेदार बाजूला झाले आहे.

सदरचा हा रस्ता कोणत्या योजने मार्फत पूर्ण करण्यात आला? या रस्त्यासाठी कोणत्या योजनेच्या अंतर्गत किती निधी मंजूर झाला? मंजूर होऊन मिळालेला निधी किती? रस्त्याला मंजूर फलक सुद्धा लावण्यात आले नाही, यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झालेला असून नेमके काय गौडबंगाल झालेले आहे याबाबत ची सर्वच प्रश्न अनुत्तरित आहेत.

सदर रस्त्ता कोणत्याही पद्धती ने मजबुती करण्यात आलेला नाही, त्याच रस्त्यावर थातूर मातुर डांबर टाकून लवकरात लवकर काम आटपवून टाकण्यात आले, या मध्ये ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने सर्व बोगस काम करण्यात येत आहे, तरी या रस्त्यांच्या कामासंदर्भात लवकर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील जनतेकडून करण्यात येत आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!