जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील

आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर रस्त्यावर उन्हात बसून भाजीपाला अथवा किरकोळ वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांना ऊन-पावसाचा सामना करावा लागतो. त्यांची ही अडचण लक्षात घेत रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे शहरातील विविध भागात रस्त्यावर विक्री करणाऱ्या गरजू विक्रेत्यांना छत्र्यांचे मोफत वितरण करण्यात आले.

छत्री वाटप प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख रोटे. आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब सदस्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, आझाद चौक, चिंच चौक, मेन रोड आणि मच्छी बाजार परिसरातील विक्रेत्यांना या छत्र्यांचे मोफत वितरण केले.

या प्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे अतिरिक्त सचिव३ नितीन अहिरराव, सहसचिव आशिष जयस्वाल, सदस्य चेतन टाटिया, गौरव महाले, विश्वास दलाल, वसंत नागपुरे, विपुल छाजेड तसेच क्लब अध्यक्ष संजय बारी उपस्थित होते.

यावेळी विक्रेत्यांनी आपल्यामुळे रहदारीला अडथळा येऊ नये याची काळजी घ्यावी, असे क्लब सदस्यांनी आवर्जून सांगितले. या मदतीमुळे आपला त्रास नक्की कमी होईल, अशा शब्दांत विक्रेत्यांनी आनंद व्यक्त केला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!