आमदार हिकमत दादा उढाण यांनी घनसावंगीच्या दुष्काळसदृश परिस्थितीचा पाढाच मांडला – पीकविमा, कर्जमाफी, चारा छावण्या आणि पाणीटंचाईवर ठोस आश्वासन

जालना, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे :

घनसावंगी मतदारसंघातील भीषण दुष्काळसदृश परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी आमदार हिकमत दादा उढाण यांनी थेट मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या १५ प्रमुख मागण्यांचे निवेदन त्यांनी मंत्र्यांना सादर केले.

या निवेदनाची गंभीर दखल घेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी निवेदनावर तात्काळ सही करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आमदार हिकमत दादा उढाण यांनी सांगितले की, घनसावंगी भागात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची होणारी दैना आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याला दिलासा देणे गरजेचे आहे. पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीची मदत देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी मंत्र्यांना सांगितले.

निवेदनातील १५ प्रमुख मागण्या :

१. पीकविमा मानवी पंचनामे करावेत

२. २०२४-२५ प्रलंबित पीकविमा तातडीने वाटप करावा

३. कर्जमाफी करून CIBIL रद्द करावा

४. कोरडवाहू ५० हजार, बागायती १ लाख, भूमिहीन २५ हजार मदत द्यावी

५. घनसावंगी, जालना, अंबड येथे चारा छावण्या सुरू कराव्यात

६. फळबागांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा

७. पाणीटंचाईचा तातडीचा आढावा व उपाययोजना करावी

८. पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करावे

९. जलजीवन मिशनची कामे गतीने पूर्ण करावी

१०. वीज बिल स्थगिती व सिंगल फेज वीज पुरवठा करावा

११. आचारसंहिता अडथळा न करता कामे चालू ठेवावीत

१२. रेशन धान्य वितरण वाढवावे

१३. विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करावी

१४. पाणीपट्टीत सवलत द्यावी

आमदार उढाण यांच्या या पाठपुराव्यामुळे घनसावंगीच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!