मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

जालना जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व तालुके तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अरुणदादा हरीभाऊ साबळे (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तसेच दुष्काळग्रस्त नागरिकांच्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या.

प्रमुख मागण्या

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाने केलेल्या मागण्या १)जालना जिल्ह्यातील सर्व आठ तालुके तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, २) शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, ३) चारा छावण्या व पाण्याची व्यवस्था करावी, ४) विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, ५) रोजगार हमी योजनेंतर्गत गावागावात कामे उपलब्ध करून द्यावीत, ६) पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी केली आहे.

तसेच संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफी, टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे व खते, दुष्काळी कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई आणि त्रि-सदस्यीय देखरेख समिती नेमण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

८ दिवसांत मागण्यांवर निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन व बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!