जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

शहरातील अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या जालना-बीड रस्त्यावरील बसस्थानक परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास एका भीषण आगीने थैमान घातले. पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या या आगीत रस्त्यालगतची ६ ते ७ दुकाने जळून पूर्णपणे खाक झाली आहेत. ऐन दुष्काळी परिस्थितीत डोळ्यांसमोर दुकाने जळून राख झाल्यामुळे हतबल झालेल्या व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आगीचे तांडव आणि प्रशासकीय ढिसाळ कारभार

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास अचानक लागलेल्या या आगीने अल्पावधीतच उग्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाला इतक्या तीव्र होत्या की, बघता-बघता ७ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत बऱ्याच वेळानंतर आग आटोक्यात आणली.

सुदैवाने, ही घटना पहाटे घडल्यामुळे वर्दळ नसताना मोठी जीवितहानी टळली; परंतु आगीचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!