जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

मंठा तालुक्यातील आकणी पाटी ते आकणी गावापर्यंतच्या सुमारे चार किलोमीटर रस्त्याचे काम कार्यारंभआदेश (थीज्ञ जीवशी) मिळूनही लांबणीवर पडले आहे. गेल्या दोन ते अडीच दशकांपासून (२०-२५ वर्षे) पक्‌या रस्त्यापासून वंचित असलेल्या आकणीकरांचा अखेर संयम सुटला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले असून, तातडीने कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

रस्त्याची दुर्दशा आणि स्थानिकांची पायपीटः

आकणी गावात सुमारे चार हजार नागरिक वास्तव्य करतात. येथील शेतकरी डाळिंब, मोसंबी यांसारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेतात. मात्र, गेल्या २० ते २५ वर्षांपासून पक्का रस्ता नसल्यामुळे शेतमाल बाजारात नेण्यात मोठी अडचण येते. खराब रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, तसेच तातडीच्या उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत.

कार्यारंभ आदेश मिळूनही कामाचा पत्ता नाही, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याला मंजुरी मिळाली.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!