जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.

चोपडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे तालुकाध्यक्ष गजेंद्र जैसवाल यांच्या पुढाकाराने व संपूर्ण पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता शहर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी १८ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष नियोजन करून जबाबदारी पार पाडणारे पोलीस निरीक्षक पवन देसले साहेब व त्यांच्या संपूर्ण पोलीस टीमचा सन्मान करण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे मिरवणूक शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडली.

पोलीस प्रशासनाचा गौरव

पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी, तसेच सचिन चौधरी, युवराज वाळूंज, योगेश्वर हिरे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फुलांचे हार, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना गजेंद्र जैसवाल यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “आजचा हा कार्यक्रम सर्वधर्मीय व सर्वपक्षीय स्वरूपाचा आहे. चोपडा शहरातील गणेश उत्सव अतिशय शांततेने व निर्विघ्नपणे पार पडला. यामागे पोलीस निरीक्षक पवन देसले साहेब व त्यांच्या संपूर्ण टीमचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी हा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या कामाची ही पद्धत अशीच कायम राहो, अशा शुभेच्छा.”

नगरपालिका व महावितरणच्या कर्मचाऱ्यांचेही योगदान

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनात *चोपडा नगरपरिषद आणि महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

नगरपरिषद प्रशासनाकडून उपमुख्याधिकारी संजय मिसर, नगर अभियंता डिगंबर वाघ, विद्युत अभियंता प्रमोद पाटील, स्वच्छता निरीक्षक वसंत राठोड, दीपाली साळुंके, जयेश भोंगे, तसेच सिटी कोऑर्डिनेटर, मुकादम, सफाई कर्मचारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

महावितरणकडून उपकार्यकारी अभियंता संदीप बोरसे, सहाय्यक अभियंता दीपक पाटील, सहाय्यक अभियंता तुषार कापगते, प्रधान तंत्रज्ञ रवींद्र खलसे, वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश धनगर, प्रशांत भामरे, लक्ष्मण महाजन, तंत्रज्ञ तिलक पाटील, योगेश धनगर तसेच विद्युत सहाय्यक सुजित धनगर यांचा सन्मान करण्यात आला.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान वीजपुरवठा व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक नियोजन आणि तत्पर सेवा देत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

सर्वपक्षीय उपस्थितीने कार्यक्रमाला व्यापक स्वरूप

हा सत्कार समारंभ सर्वधर्मीय व सर्वपक्षीय स्वरूपाचा होता. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, नागरिक, गणेश भक्त, नगरपरिषद अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गजेंद्र जैसवाल, अनिल वानखेडे, नरेश महाजन, शरद पाटिल,सागर नेवे, गौरव सोनार, दिनेश जाधव, प्रविण पाटील, मनीष गुजराथी, राजेंद्र बडगुजर, अॅड. उमेश मराठे, प्रविण जैन, मनोहर बडगुजर, हरीश माळी, दत्तू माळी, हेमंत जोहरी, कमलेश सोनवणे, रोहन गुजराथी, समाधान सपकाळे, श्याम परदेशी, नितीन भाट, विजय माळी, गिरीश भाट, जिग्नेश कणखरे, अशोक शिंपी, कैलास भाट, संजय अग्रवाल, मितेश भावसार, विशाल भावसार, संदीप चव्हाण, प्रविण चौधरी, टी सी पाटील, रमेश चौधरी, स्वप्नील चौधरी, भरत राजपुरोहित, विनोद भोई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पुढाकाराने आयोजित या कृतज्ञता सत्कारामुळे गणेश विसर्जन सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव झाला. नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पोलीस प्रशासनाचे शिस्तबद्ध नियोजन, नगरपरिषदेचे व्यवस्थापन आणि महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सक्रिय सहकार्य यामुळे चोपडा शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरक्षितरीत्या पार पडली. या कामाबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!