भोकर प्रतिनिधी, प्रमोद बोरसे, विशेष वृत्तांत.

भोकर तालुक्यातील सोनारी येथे २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता वीजवाहिनीची तार तुटून शेतात पडल्याने एका बैलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत बैलाचे मालक उत्तम नारायण वारले यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

वीजवाहिनीची तार तुटून शेतात पडल्याने बैल तिच्या संपर्कात आला आणि विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्येही चिंता व्यक्त होत असून, वीजवाहिन्यांची नियमित तपासणी व देखभाल करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने पाहणी करून पंचनामा करावा आणि नियमानुसार बैलमालक उत्तम नारायण वारले यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

📍 ठिकाण : सोनारी, ता. भोकर, जि. नांदेड

📅 घटना : २० सप्टेंबर २०२६

🕗 वेळ : रात्री ८ वाजता

🐂 बैल मालक : उत्तम नारायण वारले

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!