जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.

जळगाव-चोपडा पोलीस प्रशासनाच्या प्रभावी सहकार्याने आणि सुव्यवस्थित नियोजनामुळे चोपडा शहरातील गणेश विसर्जन आज अत्यंत शांत, सुव्यवस्थित आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. ढोल-ताशांच्या गजरात, बाप्पाच्या जयघोषात आणि गुलालाच्या रंगांनी संपूर्ण शहर रंगून गेले. पोलीस यंत्रणेने घेतलेल्या विशेष खबरदारीमुळे कोणतीही अडचण उद्भवली नाही आणि मिरवणुका सुरळीत पार पडल्या.

यावेळी चोपडा शिवसेना लोकप्रिय आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध गणेश मंडळांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मान समारंभाने उत्सवाला अधिक दिमाखदार स्वरूप प्राप्त झाले.

*पोलीस सहकार्याची विशेष भूमिका* 

जळगाव-चोपडा पोलीस यंत्रणेने विसर्जनापूर्वीच सविस्तर नियोजन केले होते. वाहतूक व्यवस्था, गर्दी नियंत्रण, सुरक्षा रक्षक दल आणि महत्त्वाच्या मार्गांवर पोलीस बंदोबस्त यामुळे मिरवणुका विनाअडथळा पार पडल्या. नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परिणामी चोपडा शहराने भक्ती आणि शिस्त यांचा सुंदर संगम अनुभवला.

भक्तांनी केशरी वस्त्रे परिधान करून, केशरी झेंडे फडकवत आणि गुलाल उधळत बाप्पाला निरोप दिला. “वारेवा… वारेवा…” या जयघोषाने शहर दुमदुमले होते. रात्री उशिरापर्यंतही उत्साहाची लाट कायम राहिली.

या यशस्वी विसर्जनामागे पोलीस प्रशासनाचे शिस्तबद्ध नियोजन, नागरिकांचे सहकार्य आणि सर्व मंडळांचे संयम हे मुख्य कारण असल्याचे स्थानिकांनी नमूद केले. चोपडा शहराने पुन्हा एकदा भक्ती, एकत्रितपणा आणि सुव्यवस्थित उत्सवाचे उत्तम उदाहरण घालून दिले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!