जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा.विद्यालयात शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित **पुस्तक हंडी** हा अभिनव उपक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. या वेळेस 20 फूट उंचीवर पुष्पहार, रंगीबेरंगी फुगे, केळीचे पान, सुप्रसिद्ध लेखकांची वाचनीय पुस्तकांनी सुशोभित केलेली दही हंडी बांधण्यात आली होती.

या वेळेस सुरवातीस श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित भगवान श्रीकृष्ण व दही हंडीचे पूजन करण्यात येऊन श्रीकृष्ण जन्मावर आधारित सुरेल गीत संगीत शिक्षिका संपदा तुंबळे यांनी सादर केले. या वेळेस “गोविंदा आला रे ,गोविंदा आला” या सारख्या सुप्रसिद्ध गीतांवर विद्यार्थ्यांनी समूह नृत्य केले, तसेच विद्यार्थिनींनी गरबा नृत्य सादर केले. “राधा “च्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थिनींनी मानवी मनोरे तयार करून जल्लोषात दही लाह्यांची हंडी फोडली.

या वेळेस शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ.रमा तारे, पर्यवेक्षक श्री.जगदीश साळुंखे यांनी सहभागी विद्यार्थांच्या धाडसाचे कौतुक करून हा उत्सव आनंद, निष्काम कर्म, स्नेह व प्रेरणा देणारा असून या उपक्रमामुळे नेतृत्व, सहकार्य, संघभावना, आत्मविश्वास, समन्वय, जिद्द व शिस्त निर्माण होण्यास मदत होत असल्याचे सूचित करून वाचनाचे महत्व सांगितले. या वेळेस सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित प्रसाद देण्यात आला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.हिम्मत काळे, श्री.उमेश ढाकणे, श्री.उल्हास ठाकरे, श्री.जावेद पटेल, श्री.अशोक पाटील, श्री.बापू पाटील, श्री.मयूर पाटील, सौ.मंगला भारुळे, सौ.सुवर्णा वंजारी, सौ.रेखा पाटील, सौ.वृषाली पाटील, श्रीमती योगिता महाजन, सौ.योगिता तडवी, श्रीमती संपदा तुंबळे, सौ.मनिषा देशमुख, सौ.जयश्री नेहेते, सौ.रुपाली महाजन, श्री.हितेंद्र जोशी, श्री.श्रीकांत घुगे, श्री.सोमनाथ महाजन, श्री.पंकज महाले, श्री.प्रेम सारस्वत, श्री.आनंद पाटील, श्री.पांडुरंग सोनवणे, श्री.पंकज खंडाळे, श्री.राकेश चौधरी, श्री.दीपक पाटील, श्री. किशोर माळी, श्री.भगवान बारी. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी सहकार्य केले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!