जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्राथमिक विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी मातीच्या मूर्ती बनविण्याचा सर्जनशील उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मातीपासून गणपतीच्या मूर्तींसह विविध प्राणी-पक्ष्यांच्या आकर्षक मूर्ती साकारत आपल्या कलागुणांना वाव दिला.

मातीला विविध आकार देत विद्यार्थ्यांनी गणपती, हत्ती, सिंह, कासव, ससा, पक्षी आदी विविध प्राणी-पक्ष्यांच्या मूर्ती तयार केल्या. प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना मातीशी काम करण्याचा आनंद मिळाला. तसेच निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि हस्तकौशल्य विकसित होण्यास मदत झाली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मातीच्या गणेशमूर्तींमधून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यात आला. प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या मूर्तींचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

या उपक्रमासाठी पर्यवेक्षक निलेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले. उपशिक्षिका अनिता सोनवणे, करिष्मा चव्हाण व परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती तयार करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य केले.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध कलाकृती साकारल्या. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. अभ्यासासोबतच अशा कृतीशील उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि कौशल्यांना चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!