समतेचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या श्री. चक्रधर स्वामींच्या विचारांचा जाग

रावेर | शाकीर शेख, जळगाव जिल्हा प्रतिनिधी.

रावेर येथील सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात श्री. चक्रधर स्वामी यांची जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. शाळेचे पर्यवेक्षक श्री. वाय. जी. कट्यारमल सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती ए. व्ही. महाजन मॅडम यांनी श्री. चक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्यावर, विचारांवर तसेच समाजप्रबोधनातील योगदानावर सविस्तर मार्गदर्शन केले. चक्रधर स्वामींच्या समतावादी विचारसरणीची आणि मानवतावादी दृष्टिकोनाची ओळख विद्यार्थ्यांना करून देत त्यांच्या विचारांचे आजच्या समाजजीवनातील महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय मनोगतात श्री. वाय. जी. कट्यारमल सर यांनी श्री. चक्रधर स्वामी यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेत सदाचार, समता आणि मानवतेची मूल्ये आपल्या जीवनात आचरणात आणावीत, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. एन. व्ही. चौधरी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन उत्सव समिती प्रमुख सौ. एन. व्ही. चौधरी मॅडम आणि श्री. वाय. पी. महाजन सर यांनी केले.

यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात श्री. चक्रधर स्वामी जयंती कार्यक्रमाची सांगता झाली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!