भुसावळ प्रतिनिधी

राजपूत समाजाच्या संघटन व सक्षमीकरणासाठी नवी जबाबदारी; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

राजपूत समाजाच्या संघटन, सक्षमीकरण आणि समाजहिताच्या कार्यासाठी कार्यरत असलेल्या श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना या संघटनेच्या भुसावळ तालुका ग्रामीण अध्यक्ष पदी चोरवड येथील नितीन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्ती पत्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत व जिल्हा अध्यक्ष संदीप राणा यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले तसेच भुसावळ येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले सुरेश बीरसिंग पाटील यांची भुसावळ तालुका कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, या नियुक्त्यांमुळे भुसावळ राजपूत समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ही नियुक्ती सनातन रत्न परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा डॉ. शीला भाभीसा सुखदेवसिंहजी गोगामेडी, राष्ट्रीय कार्यकारी उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय संघटन महामंत्री योगेंद्रसिंहजी कट्यार, राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयराजसिंहजी गोगामेडी, राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंदसिंहजी ठोके आणि महामंत्री सूरजसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंहजी पाटील यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या.

चोरवड येथील नितीन पाटील यांनी केलेल्या समाजकार्याची दखल करणी सेनेने घेतली असून त्यांना ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर सुरेश बीरसिंग पाटील यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांच्यावर तालुका कार्यकारी अध्यक्ष या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नियुक्तीनंतर मनोगत व्यक्त करताना नितीन पाटील व सुरेश पाटील यांनी राजपूत समाजाचे संघटन अधिक बळकट करणे, समाजातील विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे आणि समाजहितासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणे हेच आपले प्रमुख ध्येय राहील, असे सांगितले.

तसेच प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंहजी पाटील कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी करणी सेनेचे सहप्रवक्ते राजेंद्रसिंह पाटील, प्रदेश सचिव आनंदा पाटील, जिल्हा अध्यक्ष संदीप सिंह राणा, महिला जिल्हाध्यक्ष सारिका पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिवाणसिंह राजपूत, शहराध्यक्ष गोकुळ राजपूत, जिल्हा सरचिटणीस पंकज चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष मीना राजपूत,जिल्हा सचिव कविता राजपूत, महिला तालुका अध्यक्ष जयश्री राजपूत, शहर अध्यक्ष प्रतीक्षा पाटील, विनोद पवार छत्रपती संभाजीनगर, मोहनसिंग पवार पाटील चाळीसगाव, लता पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!