जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधांना अधिक बळकटी देण्यासाठी यावल व रावेर बस आगारासाठी प्रत्येकी ५ अशा एकूण १० नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या नवीन बसेसमुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार वर्ग तसेच सर्वसामान्य प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

मतदारसंघातील नागरिकांची ही महत्त्वपूर्ण मागणी पूर्ण करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत १० नवीन बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री मा.ना.श्री.प्रतापजी सरनाईक यांचे मनःपूर्वक आभार!

तसेच या मागणीसाठी सहकार्य व प्रयत्न करणारे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नाशिक पालकमंत्री संकटमोचक मा.ना.श्री.गिरीशभाऊ महाजन, केंद्रीय युवक व क्रीडा राज्यमंत्री तथा रावेर खासदार मा.श्रीमती रक्षाताई खडसे, स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील, वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री.संजयभाऊ सावकारे, चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.चंद्रकांत अण्णा सोनवणे आणि विधानपरिषद आमदार मा.श्री.नंदूभाऊ महाजन यांचेही मनःपूर्वक आभार!

रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक सुविधा मिळाव्यात, यासाठी माझे प्रयत्न सातत्याने सुरूच राहतील.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!